DRAG
img
N A N I S B U I L D C O N

We have successfully completed multiple landmark projects under the Vedant brand, setting new benchmarks in design, construction, and customer satisfaction.

Get In Touch

img

J-13, Ground floor, West High Court Road,

Laxmi Nagar, Nagpur - 440022

फ्रीहोल्ड प्रॉपर्टी म्हणजे नक्की काय?

Blog Image

फ्रीहोल्ड प्रॉपर्टी म्हणजे नक्की काय?

आपण जेव्हा एखादे घर घेत असतो तेव्हा आपल्याला ते घर आणि ती प्रॉपर्टी कोणत्या प्रकारात पडते हे जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे असते. जसे की ती प्रॉपर्टी लीजहोल्ड प्रॉपर्टी आहे किंवा ती फ्रीहोल्ड प्रापर्टी आहे.
आता फ्रीहोल्ड प्रॉपर्टी म्हणजे  जिथे मालक / सोसायटी / रहिवासी, कल्याण संस्था यांच्या मालकीची ती इमारत किंवा ते घर असते आणि ती कायमस्वरूपी नावावर राहते.  जेव्हा आपण फ्रीहोल्ड प्रॉपर्टी खरेदी करता तेव्हा याचा अर्थ असा आहे की ती मालमत्ता तुमच्या नावावर होते. फ्रीहोल्ड प्रॉपर्टीचे मार्केट व्हॅल्यू नेहमीच जास्त असते, बँका आपल्याला अधिक गृह कर्ज देण्यास देखील तयार असतात. आपणास त्यासाठी भाडे देण्याची गरज नाही.

फ्रीहोल्ड प्रॉपर्टी ही  ‘फ्री फ्रॉम होल्ड’ म्हणजे त्या जागेवर कोणीही त्या जागेच्या मालकाशिवाय कायदेशीरपणे हक्क बजावू शकत नाही.  अशा मालमत्तेच्या मालकास त्या ठिकाणाच्या नियमांनुसार ती जागा कोणत्याही हेतूसाठी वापरण्याचा अधिकार आहे. फ्रीहोल्ड प्रॉपर्टीच्या विक्रीसाठी कागदपत्रांच्या तुलनेत कमी गोष्टींची आवश्यकता असते.  त्यात शासकीय अधिकृतता मागण्याची आवश्यकता नसते. याचा अर्थ असा आहे की भाडेपट्टीच्या मालमत्तेपेक्षा फ्रीहोल्ड मालमत्ता खरेदी करणे सोयीस्कर असते.

ही प्रॉपर्टी तुमच्या कायमस्वरूपी मालकीची असल्यामुळे कोणतीही बाहेरील व्यक्ती त्यावर हक्क बजावू शकत नाही.  प्रापर्टी मालक कोणत्याही मर्यादेशिवाय मालमत्ता हस्तांतरित करू शकतात. घरावर मालकाचा पूर्ण हक्क असतो. मालमत्ताधारकांना वार्षिक जमीन भाडे द्यावे लागत नाही. मालमत्तेचे मालकी हक्क असल्यामुळे प्रॉपर्टी पुढे हस्तांतरित करण्यास कोणतेही निर्बंध नसतात.

 त्याचबरोबर फ्रीहोल्ड प्रॉपर्टीची देखभाल करण्याची जबाबदारी सुद्धा तुमची असते त्यासाठी दुसर्‍यावर अवलंबून राहण्याची गरज नाही. त्यात सर्वात जास्त फायद्याची गोष्ट म्हणजे भाडेपट्टी मालमत्तेच्या तुलनेत अधिक स्थिर आणि दीर्घ कालावधीत मूल्य वाढण्याची शक्यता.

फ्रीहोल्ड प्रॉपर्टीसाठी होम लोन
लीजहोल्ड प्रॉपर्टीच्या तुलनेत बँका सामान्यत: फ्रीहोल्ड प्रॉपर्टीसाठी होम लोन देण्यास तयार असतात.  कारण फ्रीहोल्ड मालमत्तेची नोंदणी सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून एक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते आणि त्यामध्ये मूल्य वाढण्याची देखील अपेक्षा असते. बँका उच्च बाजार मूल्य असलेल्या फ्रीहोल्ड प्रॉपर्टीसाठी गृह कर्जाची मोठी रक्कम मंजूर करण्यास देखील तयार असतात.

त्यात ती प्रॉपर्टी विकताना कागदपत्र हस्तांतरित करण्यासाठी कोणत्याही कायदेशीर संमतीची आवश्यकता नाही. अडचणीच्या काळात बँका फ्रीहोल्ड प्रॉपर्टीस आर्थिक मदत पुरवतात. सहसा, खरेदीदार फ्रीहोल्ड प्रॉपर्टी खरेदी करण्यास प्राधान्य देतात कारण भाडेपट्टी मालमत्तेच्या तुलनेत त्यांच्या किंमती हळूहळू वाढ होते. शिवाय, भाड्याने घेतलेल्या मालमत्तेच्या तुलनेत फ्रीहोल्ड मालमत्तेवर एखादे लोन मिळवणे देखील सोपे असते.

बर्‍याच मेट्रो शहरात मालमत्तेच्या किंमती वर्षानुवर्षे वाढत आहेत. मेट्रो शहरात मोक्याची जागा मिळणे अधिक चांगले असते आणि त्यासाठी नानी'ज बिल्डकॉन घेऊन आले आहेत वेदांत गार्नेट एक असा प्रोजेकट त्यात तुम्हाला मिळेल  २ BHK आणि ३ BHK प्लस टेरेस ऑफोर्डब्ल फ्लॅट जो बसणार तुमच्या रिअल इस्टेटच्या इनव्हेसमेंटमध्ये फायदेशीर ते ही तुमच्या आवडत्या शहरात म्हणजे आपल्या नागपूरमध्ये!  आपल्याला ही रिअल इस्टेट गुंतवणूकीकडे जाण्याची ही योग्य वेळ आहे. वैयक्तिक वापरासाठी एखाद्या सुरक्षित आणि योग्य मालमत्तेत गुंतवणूक करा.

आजच आम्हाला संपर्क करा आणि तुमच्या भविष्याची गुंतवणूक सुरक्षित करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked