DRAG
img
N A N I S B U I L D C O N

We have successfully completed multiple landmark projects under the Vedant brand, setting new benchmarks in design, construction, and customer satisfaction.

Get In Touch

img

J-13, Ground floor, West High Court Road,

Laxmi Nagar, Nagpur - 440022

शोधा सुखाचे क्षण आपल्याच घरात!

Blog Image

शोधा सुखाचे क्षण आपल्याच घरात!

आपले खरे सुख हे आपल्याच घरात असते. हो ना? कोरोनाच्या या वाढत्या संसर्गामुळे आता प्रत्येकाला स्वतःचे घरच अधिक सुरक्षित वाटू लागले आहे. काय कुठून हा कोविड १९ म्हणजेच कोरोना आला आणि जगभरात पसरला. काही कळायच्या आतच अनेकांना याने आपले लक्ष्य केले आणि यातच कित्येक लोकांना आपला जीव गमवावा लागला.


भारतासारख्या लोकसंख्येने बलाढ्य असणाऱ्या देशात याचा फैलाव होण्याआधीच सरकारने आवश्यक ती पावले उचलली. त्यामुळे या कोरोना विषाणूला वेगाने पसरण्याची संधीच मिळाली नाही. सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे सर्वांना घरातच थांबावे लागले. स्वतःचे राहते घरच त्यांचे रक्षक बनले ही बाब आपल्याला नाकारता येणार नाही. लॉकडाऊनमुळे या कोरोनापासून बचाव करता आला. घरात आहोत तोपर्यंत आपण सुरक्षित आहोत हे आता सर्वांना कळले आहे. त्यामुळे आपले घर असणे किती महत्त्वाचे आहे हे सुद्धा लोकांना समजले. पण सतत घरात असल्यामुळे, कोरोनाच्या भीतीमुळे, भविष्याच्या चिंतेमुळे लोक तणावातून जात आहेत. अशा वेळी आपण प्रत्येकाने धीराने काम घेतले पाहिजे.
ताण-तणाव आधीही मनुष्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होता. पण तेव्हा कारणं वेगळी होती. आताच्या तणावाची कारणं ही वेगळी आहेत. पण आपण स्वतःहून प्रयत्न केले तर घरातच आपण ताणतणाव विसरून आनंदी राहू शकतो. आपण घरातच आपले सुखाचे क्षण स्वतःहूनच अनुभवू शकतो. लॉकडाऊन किती दिवस असणार आहे याचा आपल्या कोणालाच अंदाज नाही. त्यामुळे आता घरात आहोत तोपर्यंत स्वतःला वेगवेगळ्या अशा  कामांमध्ये गुंतवले पाहिजे ज्यामुळे आपल्याला आनंद मिळेल.


तुम्हाला जर ऑफिसचे काम असेल तर घरातच एका चांगल्या जागेवर बसून तुम्हीच ते करू शकता. सोबतच ट्रॅव्हलिंगचा वेळ वाचल्याचा फायदा करून आपल्या आवडीनिवडी जपा. म्हणजेच तुम्हाला गार्डनिंग आवडत असेल तर घरात वेगवेगळी झाडं लावा. आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये तुम्ही ते करू शकता किंवा टेरेस फ्लॅट असेल तर तुम्हाला झाडं लावायला पुष्कळ जागा मिळेल. गार्डनिंगमुळे तुमचा वेळ खूप चांगला जाईल. आपल्या घरातल्यांसोबत   वेळ घालवा. पत्नीला, मुलांना, भाव-बहिणीला, आई-वडिलांना वेळ द्या. मुलांसोबत खेळ खेळा. कूकिंगची आवड असल्यास घरच्याघरी नवनवीन रेसिपीज ट्राय करून घरच्यांना आणि स्वतःला तृप्त करून घ्या. लोकांना आनंदी केल्याने तुम्हाला खरेच खूप बरे वाटेल.


आपल्या आवडीनिवडी जपा. जे खूप दिवसांपासून लिहायचे राहून गेले होते ते लिहून काढा. कपाटात ठेवलेले बऱ्याच दिवसांपासून वाचायचे राहून गेलेले पुस्तक काढा आणि वाचून काढा. गिटारवर नवनवीन धून ट्राय करा. नवनवीन गाणे गुणगुणा. घराची साफसफाई करा, घर अगदी चकचकीत करा. घराचे इंटेरियर करा, म्हणजे घरात उपलब्ध असलेल्या सामानाने घर सजवा. नवी चित्र, पेंटिंग्स काढा. आवडते चित्रपट पहा. रोज गाणी एका. आपल्या साथीदारासोबत घराच्या बाल्कनीमध्ये उभं राहून कॉफी शेअर करा आणि मन भरून गप्पा मारा. फोटोग्राफीची आवड असल्यास 'होम फोटोग्राफी' ट्राय करा. घरच्यांचे हसते चेहरे टिपा.. नवनवीन एक्सपिरिमेंट ट्राय करा.


आपल्या घरात आपले मन प्रसन्न राहील याची काळजी घ्या. जर आपण खुश तर घरातले खुश असे गणित लक्षात ठेवा. घरात रहा, सुरक्षित रहा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked