नवे घर असे असावे...
आपले घर सर्वात उत्तम असावे व सर्व सोयी-सुविधांनी परिपूर्ण असावे असे आपण सर्वांनाच वाटते. त्यामुळे आपले पहिले घर असो वा दुसरे, ते घेताना आपण सर्व चौकशी करून सर्व सोयी बघूनच घेतो. त्यातही पहिलेच घर असेल तर अजूनच आपल्याला काळजी लागून असते. त्याच बरोबर एक उत्साह असतो. म्हणून आपले पहिले घर घेताना ते नेहमी उत्तमच असले पाहिजे असाच प्रत्येकाचा मानस असतो.
स्वतःच्या मालकीचे घर विकत घेणे ही लॉंगटर्म कमिटमेंट आहे. त्यामुळे ते घेताना योग्य रिसर्च करूनच घेतले पाहिजे. जसे की विश्वासू बिल्डर्स कडून किंवा ओळखीच्या विश्वासार्ह लोकांकडून आपण याबद्दल विचारणा करू शकतो. जर कोणी बिल्डर ओळखीचे असतील तर त्यांना एका योग्य व आपल्या बजेटच्या घराविषयी सर्व गोष्टी विचारता येतील. नानी'ज बिल्डकॉन सुद्धा अनेक वर्षांपासून आपल्या ग्राहकांना उत्तम अशी प्रॉपर्टी घेण्यासाठी मदत करत आहे. त्यामुळे अशा विश्वासू लोकांकडून पहिले संपूर्ण माहिती मिळवा आणि मगच घर घेण्याचा निर्णय घ्या.
याशिवाय घर घेताना सर्वात महत्वाचे असते ते म्हणजे सर्व सोयी सुविधा. आपण जिथे घर घेत आहे तिकडचा आजूबाजूचा परिसर कसा आहे, सोसायटी असेल तर ती कशी आहे, घराजवळ पब्लिक ट्रान्सपोर्ट सेवा म्हणजेच बस, ऑटो, टॅक्सी वगैरे उपलब्ध आहेत का, रेल्वे स्टेशन किती अंतरावर आहे, घराजवळ चांगले शाळा-कॉलेज आहेत का, घराजवळ किराणा, सुपर मार्केट, शॉपिंग मॉल किंवा मार्केट आहे का, दवाखाने- हॉस्पिटल्स अशा फॅसिलिटीज आहेत काय या सर्व गोष्टी किंवा यातील अधिक महत्त्वाच्या गोष्टी बघून नंतरच आपले घर घेण्याचे ठिकाण ठरवावे.
घरात योग्य सूर्यप्रकाश येत आहे काय, पाण्याची मुबलक उपलब्धता, मुलांना खेळण्यासाठी ऐसपैस जागा किंवा फिरण्यासाठी गार्डन, जिम आणि स्पोर्ट्स क्लब, इमारतीची पूर्ण सेफ्टी, लिफ्ट, सीसीटीव्ही कॅमेरे, वॉचमन या सर्व सोयी सुविधा असणे हे आताच्या कंस्ट्रक्शन्स मध्ये खूपच आवश्यक आहे आणि बंधनकारक ही. त्यामुळे आपले पहिले वाहिले घर घेताना अशा सर्व गोष्टी बघूनच घेतल्या पाहिजे हे मात्र नक्की!!
नानी'ज बिल्डकॉन म्हणजे तुमच्या पहिल्या घरासाठी सर्व सोयी-सुविधापूर्वक एक योग्य आणि उत्तम घर मिळवून देणारा पर्याय आहे. तेव्हा वाट कसली बघत आहात? आताच आम्हाला संपर्क करा.
Leave a Reply
Your email address will not be published. Required fields are marked