नवे घर सजवायचे आहे?
तुम्ही तुमच्या स्वप्नातले घर घेतले आहे. तुमचे नवे घर घेण्याचे स्वप्न आता पूर्ण झाले आहे. पण हे घर एक सुंदर घर कसे बनवायचे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना?
नवे घर घेतलेल्या सर्वांनाच आपल्या नव्या घराबद्दल हाच विचार येतो की आता घर तर घेतले, पण ते घर व्यवस्थित व अगदी सुरेखपणे सजावणार कसे? अनेक जण यासाठी इंटेरिअर डेकोरेटर्सची मदत घेतात. घरातल्या प्रत्येक भिंतीवर कोणता रंग लागेल, घरात कोणते फर्निचर असेल, कोणत्या कोपऱ्यात कोणते फर्निचर असेल, घरात लाईट्स कशा असतील, देवघर, बुक शेल्फ, शू रॅक, डायनिंग टेबल सुद्धा कुठे असेल, नेमकी कोणती वस्तू कुठे असेल हे सर्वच काम इंटेरियर डेकोरेटर करून देते. पण आज आम्ही काही अशा टिप्स तुमच्या सोबत शेअर करणार आहोत ज्यामुळे तुम्हाला तुमच्या नव्या घराला सजवताना अजिबात कसल्याही समस्या येणार नाही.
आपलं घर इतरांपेक्षा आगळंवेगळं दिसावं असे प्रत्येकालाच वाटत असते. इंटेरियर डिझायनरची मदत न घेता जर तुम्हाला स्वतःहून घर सजवायचे असेल तर तुम्ही यासाठी थोडा रिसर्च जरूर करू शकता. बाजारात रोज नव्याने येणाऱ्या सजावटीच्या विविध गोष्टींचा आपण कुशलतेने वापर करून जरा "हट के' इंटेरियर केलं तर हे सहज शक्य होतं आणि त्यासाठी फार जास्त पैसे खर्च करण्याचीही गरज नसते.
कोणत्याही घराचे इंटेरिअर करताना आधी जागेचा अभ्यास करून त्या डिझाईनचा अधिकाधिक वापर कसा होईल या दृष्टीने डिझाईन करण्यावर भर दिला गेला पाहिजे. लाईट्सच्या रचनेपासून रंगसंगतीपर्यंतचा विचार करावा लागतो. घरगुती इंटेरियर व ऑफिसमधील इंटेरियर करताना तेथील गरजा, वापर याला प्राधान्य देत डिझाईन करताना प्रयत्न करावे लागतात. अनेक जण वास्तुशास्त्रानुसार घरात इंटेरियरला प्राधान्य देतात. जर तुम्हालाही त्याप्रमाणे इंटेरियर करायचे असेल तर वास्तुशास्राचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
एखाद्या खोलीत रेफ्रिजरेटर, टी.व्ही. किंवा वॉशिंग मशीन अशी कोणती उपकरणं येणार आहेत का, त्यांची लांबी-रुंदी-उंची किती असणार ते विचारात घेऊन मग त्यांच्याकरिता खोलीतल्या उपलब्ध जागा कोणत्या हे निश्चित करावं लागतं. ते एकदा का ठरलं की, मगच किती जागा उरते, ते पाहून त्यात त्या खोलीतलं दुसरं गरजेचं फíनचर कसं बसवता येईल याचा विचार करावा लागतो. त्याकरिता पुरेशी जागा नसेल, तर फोल्डेड-मोल्डेड किंवा बहुउपयोगी अशा एखाद्याच फíनचर युनिटचा पर्याय कसा उपयोगात आणता येईल.
यासोबतच घरात प्रत्येक खोलीत आकर्षक रंगसंगतीचा उपयोग करता येईल. घरात नैसर्गिक प्रकाश कमी असेल, तर उजळ रंगछटांच्या माध्यमातून दिवसाचा प्रकाश परावर्तित करून थोडासा वाढवता येऊ शकतो. कधी कधी योग्य जागी आरशांचा किंवा फíनचरला काचेच्या दरवाजांचा वापर करूनही खिडकीतून येणारा प्रकाश खोलीत इतरत्र फिरवता येऊ शकतो. घरात नैसर्गिक प्रकाश खूप चांगला असेल तर त्यानुसार डार्क रंगाचेही नियोजन करता येते.
जागेचं नियोजन, फर्निचरची आखणी, रंगसंगती, प्रकाशयोजना आणि या सगळ्याकरिता स्वत: बाजारात फिरून उपलब्ध असलेल्या याबाबतच्या सजावटीच्या पर्यायांबाबत कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त चांगला पर्याय निवडण्यासाठी बाजारातलं सर्वेक्षण, या सर्व बाबींचा अभ्यास आणि त्यावर घरातल्यांबरोबर चर्चा आवश्यक आहे. एखाद्या खोलीसाठी जेव्हा अंतर्गत सजावट करायची असेल, तेव्हा सर्वात आधी त्या खोलीचा आकार आयताकृती आहे, की चौरस, त्याची लांबी-रुंदी किती आहे यासाठी जागेच्या योग्य नियोजनाचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
हे सर्व करून आपण स्वतःच्या स्वप्नातल्या घराला स्वतःहून एक सुंदर रूप देऊ शकतो.
Leave a Reply
Your email address will not be published. Required fields are marked