लॉकडाऊन नंतर घरांच्या किमती असणार अशा...
लॉकडाऊनमुळे आयुष्य बर्यापैकी थांबले आहे. ट्रान्सपोर्ट व वाहतूक सेवा बंद असल्याने अनेकांनी नवीन घरात किंवा नवीन शहरात जाण्याच्या योजनांना रद्द केले आहे आणि पुढे ढकलले आहे. अनेकांना नवीन घरे घ्यायची आहेत. त्यासाठी आयुष्यभराची कमाई जमवून ठेवलेली आहे. कोरोनामुळे अनेक बिझनेसचे नुकसान होत आहे.
कोरोना लाॅकडाउन येण्याच्या आधी पण संपूर्ण जगात मंदीचे सावट होते. भाव स्थीर होते कारण बांधकाम व्यावसायिकांची भाव रोखून धरण्याची क्षमता होती. पण आता कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्था गडगडणार हे निश्चित आहे. भारतातही अर्थव्यवस्थेची गाडी रूळावर येण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे बांधकाम व्यवसायावर व स्थावर मालमत्ता व्यवसायावर परिणाम होणार आहे.
नवीन बांधकामे ठप्प झाली तरी तयार असलेले अथवा पूर्णत्वाकडे गेलेली घरे मागणीपेक्षा जास्त शिल्लक आहेत. आता बिल्डर खेळते भांडवलासाठी घासाघीस करून कमी भावाला नवीन घरे विक्रीस काढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच घरांचे भाव कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून घरांचे भाव गगनाला भिडलेले आहेत. त्याचप्रमाणे घरांची मागणी सुद्धा वाढत आहे आणि त्या मागणीनुसार मोठ्या प्रमाणात घरं बांधली जात आहेत. तरीसुद्धा घरांच्या किमती कमी होण्याचे नाव घेत नव्हते. परंतु आता कोरोनानंतर आपल्याला कदाचित ही स्थिती थोडी बदललेली दिसून येईल. या लॉकडाऊन नंतर आर्थिक मंदीचे चित्र बघायला मिळणार असून कदाचित त्यामुळे घरांच्या किमती खाली येण्याच्या शक्यता वर्तवला जात आहेत.
कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा परिणाम अख्या जगाला भोगावा लागत आहे. कोरोनामुळे कित्येक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर या लॉकडाऊनमुळे अनेक छोटे - मोठे सर्वच बिझनेस ठप्प झालेत. काहीही म्हंटले तरीही या लॉकडाऊनमुळे प्रत्येक बिझनेसला धक्का पोहोचला आहेच. त्यात आर्थिक मंदीच्या सावटामुळे ज्यांचे घर घेण्याचे स्वप्न होते ते आता कॅन्सल झाले आहेत. त्यामुळे कन्स्ट्रक्शन बिझनेस सुद्धा धोक्यात आले आहेत.
हे सर्व असले तरीही रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी लोकांना अजूनही रस आहे. आजही शेअर मार्केट आणि सोने खरेदी पेक्षा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या अधिकच आहे.
सध्या आर्थिक कारणांमुळे अनेकांनी आपल्या घर घेण्याच्या अथवा गुंतवणूक करण्याच्या प्रक्रियेला होल्ड वर ठेवले असले तरीही कोरोनाचे सावट गेल्यावर पुन्हा या व्यवसायात तेजी दिसून येईल हे नक्की.
Leave a Reply
Your email address will not be published. Required fields are marked