DRAG
img
N A N I S B U I L D C O N

We have successfully completed multiple landmark projects under the Vedant brand, setting new benchmarks in design, construction, and customer satisfaction.

Get In Touch

img

J-13, Ground floor, West High Court Road,

Laxmi Nagar, Nagpur - 440022

ड्रीम फ्लॅट घेताना या सुविधा (Amenities) आहेत की नाही याची पडताळणी नक्की करा!

Blog Image

ड्रीम फ्लॅट घेताना या सुविधा (Amenities) आहेत की नाही याची पडताळणी नक्की करा!

आपल्या प्रत्येकाचे काही ना काही ड्रीम्स असतात ते ड्रीम्स म्हणजे ती स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आपण नेहमीच खूप प्रयत्न करतो. त्यातील आपल्या सर्वांचे कॉमन ड्रीम म्हणजे स्वतःचे हक्काचे घर. आपण हे ड्रीम पूर्ण करताना अनेकदा होम लोनचा ही मार्ग निवडतो आणि आपले घर बुक करतो. पण बहुतेकदा आपण ते घर किंवा तो फ्लॅट आवडला कि लगेच विकत घेण्यास तयार होतो. पण ते घर तुमचे स्वप्नातले ड्रीम घर म्हणून पूर्ण होते का? तर उत्तर आहे नाही, कारण कुठल्या ही गोष्टी न पडताळून फक्त घर घेणे हे चुकीचे आहे. आपल्या ड्रीम फ्लॅटचे स्वप्नं  तेव्हाच पूर्ण होते जेव्हा तो फ्लॅट सर्व गोष्टीमध्ये चांगला असेल आणि आपल्याला सुरक्षित भविष्याची चिंता करावी लागणार नाही.  आणि त्यासाठी काय हवे? तर त्या आहेत फ्लॅटशी निगडित सुविधा (Amenities). तर त्या नेमक्या सुविधा कोणत्या आणि त्या सुविधा का गरजेच्या आहेत जाणून घेऊया.  

१. मूलभूत सुविधा
आपण जेव्हा एखादे घर घेतो तेव्हा आपल्याला पुढे जाऊन मिळणाऱ्या मूलभूत सुविधा योग्य आहेत की नाही  याची पडताळणी करणे महत्त्वाचे आहे. जसे की २४ तास पाणी, टॉयलेट, योग्य इलेक्ट्रिसिटी पॉवर सुविधा आहे की नाही हे  बघणे आवश्यक असते.

२. पार्किंग फॅसिलिटी
बहुतेकदा काही इमारतींना पार्किंगची सुविधा नसल्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात.  त्या होऊ नये म्हणून आपल्याला पार्किंगची सुविधा असलेल्या इमारतीमध्ये आपले घर घेणे सोयीस्कर ठरते.

३. भूकंप प्रतिरोधक
सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या व आपल्या कुटुंबियांना कोणत्याही नैसर्गिक आपत्तीपासून धोका निर्माण होऊ नये.  त्यासाठी भूकंप प्रतिरोधक आर.सी.सी. फ्रेम रचना असलेल्या इमारतींची निवड करणे हेच हुशारीचे आहे.  

४. सुरक्षा यंत्रणा
जवळजवळ सर्व गृहनिर्माण प्रकल्पात काही प्रमाणात सुरक्षा दिली जाते. रक्षकांव्यतिरिक्त, सुरक्षा कॅमेरे गृहनिर्माण सुरक्षिततामध्ये देतात . नवीन अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये, सर्व एंट्री / एग्जिट डेटा डिजिटलपणे कॅप्चर करण्यासाठी हाय-एंड डिजिटल सिक्युरिटी सिस्टमची अंमलबजावणी केली जाते. रहिवाशांना गेटवर प्रवेश करणाऱ्या व्यक्तीपासून ते  रहिवाशांपैकी एखाद्याची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय कोणत्या व्यक्तीचा प्रवेश असेल याची खात्री करुन घेतली जाते. आताच्या परिस्थितीत आपली सुरक्षितता ही अत्यंत गरजेची आहे. त्याचप्रकारे अश्या वेगवेगळ्या गोष्टींची सुविधा असणे गरजेचे आहे.

५. मोक्याचे ठिकाण
आपण जेव्हा घर घेत असतो तेव्हा त्या इमारती जवळ कोणत्या गोष्टींची सुविधा आहे ते पाहणे तितकेच आवश्यक असते. जसे की मेडिकल स्टोर, हॉस्पिटल, एटीम, भाजी मार्केट, शॉपिंग सेंटर आणि वाहतुकीच्या सर्व सोयी इत्यादी.  

बर्‍याच मेट्रो शहरात मालमत्तेच्या किंमती वर्षानुवर्षे वाढत आहेत. मेट्रो शहरात मोक्याची जागा मिळणे अधिक चांगले असते आणि त्यासाठी नानी'ज बिल्डकॉन घेऊन आले आहेत वेदांत गार्नेट एक असा प्रोजेकट त्यात तुम्हाला मिळेल  २ BHK, ३ BHK प्लस टेरेस ऑफोर्डब्ल फ्लॅट जो बसणार तुमच्या रिअल इस्टेटच्या इनव्हेसमेंटमध्ये फायदेशीर ते ही तुमच्या आवडत्या शहरात म्हणजे आपल्या नागपूरमध्ये!  आपल्याला ही रिअल इस्टेट गुंतवणूकीकडे जाण्याची ही योग्य वेळ आहे. वैयक्तिक वापरासाठी एखाद्या सुरक्षित आणि योग्य मालमत्तेत गुंतवणूक करा.
आजच आम्हाला संपर्क करा आणि तुमच्या भविष्याची गुंतवणूक सुरक्षित करा.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked