What’s in the budget for real estate sector?
View Blog
कोरोनामुळे सध्या संपूर्ण जगात आर्थिक नुकसान होत आहे. त्यात आपल्या देशाची अर्थव्यवस्था सुद्धा पूर्णपणे कोलमडली आहे. अनेक उद्योगधंदे कोरोनामुळे ठप्प झाले आहेत तर अनेक कंपन्यांनी त्यांची दारं कायमची शटडाऊन केली आहेत. अधिकतर चाकरमान्यांनी घरात राहूनच काम करण्याची पसंती दर्शविली आहे. या सर्वांसोबतच रिअल इस्टेट क्षेत्राची अवस्था सुद्धा अद्याप वाईट आहे. लोकांना घर खरेदी करण्यात रस तर आहे पण अनेकांना पैशांच्या अडचणीमुळे ते शक्य होत नाहीये. तथापि, भविष्यात घर घेण्याचे प्रमाण वाढेल अशी बरीच शक्यता आहे. २०२२-२5 दरम्यान, गृहनिर्माण विभाग रिअल इस्टेट क्षेत्रात पुनरुज्जीवन करू शकेल.
अशा अनेक गोष्टी आहेत ज्या गृहनिर्माण विभागात वाढीची अपेक्षा करतात. सध्याच्या परिस्थितीत अधिकाधिक लोकांनी घरून काम करण्यास सुरवात केली आहे. बर्याच आयटी कंपन्यांनी असेही म्हंटले आहे की, आता घरून काम करणे हे त्यांच्या कामकाजाचे कायम वैशिष्ट्य ठरेल. जास्तीत जास्त शक्य तितक्या कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची मुभा कंपन्या देत आहे. त्यामुळे पुढील काळात वर्क फ्रॉम होमचे प्रमाण खूपच वाढणार आहे.
घरातून काम केल्याने आपल्या जगण्याच्या मार्गामध्ये मोठा बदल होऊ शकतो. यामुळे ऑफिसला न जाता शहरांच्या बाहेरील भागात मोठे घर घेणे सुद्धा आता योग्य ठरेल. शहरातील बहुतेक घरे छोटी आहेत तरी सुद्धा वर्क फ्रॉम होम कल्चर रूढ करण्यासाठी अनेकजण स्वतःच्या घराचा शोध घेत आहेत. आपल्या राहत्या घरात होम ऑफिस किंवा अभ्यासाची जागा बनविणे हाच सध्याचा मोटो आहे. कंपन्यांना हे देखील समजले आहे की कमी प्रवास करणे म्हणजे अधिक उत्पादनक्षमता. त्यामुळे जास्तीत जास्त कंपन्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमच सांगू लागले आहेत. त्यामुळे स्वतःचे घर घेणाऱ्यांचे प्रमाण काही काळात वाढू शकेल हे नक्की..
तज्ञांचा असा विश्वास आहे की घर खरेदीदारांनी आधी त्यांच्या नोकरीची सुरक्षा इत्यादी बाबींकडे लक्ष दिले पाहिजे. ते येत्या तिमाहीत अशा प्रकारच्या रिअल इस्टेटचा शोध घेऊ शकतात. त्यामुळे घरांच्या किमतींवर सुद्धा याचा प्रभाव पडेल. लॉकडाऊनमुळे नवीन व्यवहार होत नसल्याने घरांच्या किमतींमध्ये चढ उतार जाणवेल. घरांच्या किमतींबद्दल येणाऱ्या काळात स्पष्टता दिसून येईल. तोपर्यंत ग्राहकांनी आपल्याला हवे तसे घर बघून ते बुक करून ठेवणे सोयीचे ठरेल. तथापि, तज्ञांना असे वाटते की पुढील 2-3 महिन्यांत या सर्व ऍक्टिव्हिटीज वाढतील.