What’s in the budget for real estate sector?
View Blog
आपले स्वतःचे घर घेणे म्हणजे आयुष्यभराची गुंतवणूक करणे असते. हा फंडा अनेकांना माहिती असतो. त्यामुळे पूर्वीपासून कित्येक लोकांनी स्वतःची घरं घेऊन ठेवली आहेत. पण वाढत्या शहरीकरणामुळे म्हणा किंवा पैशांच्या समस्येमुळे प्रत्येकालाच घर घेणे शक्य होते असे नव्हे. पण काहीही असो, स्वतःचे घर असणं म्हणजे आयुष्यात सगळ्यात मोठी गुंतवणूक आहे ही गोष्ट खरीच आहे.
रिअल इस्टेट ही एक अशी गोष्ट आहे जिथे केलेली गुंतवणूक कधीच वाया जात नाही किंवा भविष्यात तिचा भरपूर फायदा होऊ शकतो. जमिनीचे भाव हे सर्वत्रच वाढत असतात. त्यामुळे मोक्याच्या जागा हेरून जमीन घेऊन किंवा घर घेऊन गुंतवणूक करणं फायदेशीर ठरतं. कालांतराने खरेदी केलेल्या त्या जमिनीवर निवासी किवा व्यापारी संकुलाची निर्मिती करून पैसा कमवण्याची संधी सुद्धा उपलब्ध होते. आज छोट्या जमिनीचे मालक असणारे अनेक मध्यमवर्गीय गुंतवणूकदार व्यावसायिक बिल्डर बनल्याची उदाहरणं आहेत. आता सध्या मुंबई, दिल्ली, गुजरात सोबतच नागपूर सुद्धा मोठे औद्योगिक शहर म्हणून नावारूपास येत आहे. नागपूरमध्ये अनेकांनी स्वतःची १ बीएचके, २ बीएचके फ्लॅट्स घेऊन ठेवली आहेत. सध्या नागपूर मध्ये १ बीएचके, २ बीएचके पासून अगदी ३ बीएचके फ्लॅट्सना सुद्धा मागणी आहे. येत्या काळात नागपूरमध्ये घरांची ही मागणी वाढत जाईल असे दिसून येत आहे.
गुंतवणूक करण्याचे असंख्य पर्याय आज उपलब्ध आहेत. पण रिअल इस्टेट मधील गुंतवणुकीचे महत्त्व इतर पर्यायांपेक्षा निश्चितच वेगळे आहे. अन्य पर्यायांचा मुख्य फायदा हा परतावा मिळण्यात असतो. परंतु रिअल इस्टेट मधील गुंतवणुकीतून चांगला परतावा तर मिळतोच, त्याचबरोबर इतरही अनेक फायदे मिळू शकतात.
आज बरीच मंडळी भाड्याच्या घरात राहायचं की स्वतःचं घर विकत घ्यायचं, अशा द्विधा मनःस्थितीत असतात. अशातच स्वतःचे घर नसेल तर भाड्याच्या घरात राहणं निवडावं लागतं. त्यामुळे भाडं देणं ठरलेलंच असतं. हेच भाडं शहरी भागात प्रतयेक घरामागे खूप जास्त असतं. आता एक विचार करा, आपण जर इतकं भाडं देऊ शकतो, तर मग कर्ज तत्वावर स्वतःचं घर का नाही घेऊ शकत? म्हणजे भाड्याच्या घरात पैसे देण्यापेक्षा स्वतःचे घर घेऊन कर्जाचे हफ्ते फेडलेले काय वाईट? अर्थात थोडे अधीक पैसे जातील, पण स्वतःच्या नावावर घर असेल याचे समाधान वेगळे.. हो की नाही?
कधी कधी नवीन घर घ्यायची सुद्धा गरज नसते. जर भाड्याच्या घरात राहत असाल आणि घरमालकाला घर विकायचे असेल तर त्यांच्याशी तडजोड करून तेच घर घेणे सुद्धा अनेकांना परवडू शकते. थोडी अधिक किंमत देऊनसुद्धा राहतं घर घ्यायला हरकत नाही. कारण ती वेळ आणि संधी घालवली तर पुन्हा येत नाही आणि त्यापासून मिळणारे फायदे कुठल्याच तराजूत किवा कॅलक्युलेटरवर मोजता येत नाहीत.
म्हणूनच शहाणे लोकं नेहमी गुंतवणूक करण्यासाठी रिअल इस्टेटचा विचार पहिले करतात. कारण रिअल इस्टेटसारखा गुंतवणुकीचा दुसरा पर्याय नाही.. रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक करायची असल्यास नागपूर आता हाय पॉईंटवरील शहर बनत आहे. त्यामुळे तुम्ही नागपूरमध्ये १ बीएचके, २ बीएचके पासून अगदी ३ बीएचके फ्लॅट्स घेऊन येथे गुंतवणूक करायचा विचार करत असाल तर तो भविष्यासाठी अतिशय योग्यच ठरणार आहे.