What’s in the budget for real estate sector?
View Blog
नवीन घर घ्यायचे असेल तर आपल्याला हव्या असणाऱ्या एरियामध्ये जाऊन किंवा नवीन कन्ट्रक्शन जिथे बनत आहे तिकडे जाऊन घर बघावे लागते. पण आता कोरोनाच्या या संकटकाळी बाहेर तर सोडा स्वतःच्या घरात बसायची वेळ सर्वांवर आली आहे. परंतु आता हळू हळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. तरीही कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडण्यास कोणीही तयार नाहीत. त्यामुळे अनेकांच्या घर घेण्याच्या स्वप्नावर पाणी फेरले गेले आहे.
पण अशातच रिअल इस्टेटमध्ये एक नवी कल्पना उदयास आली आहे. ती म्हणजे ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करून ग्राहकांना हव्या असणाऱ्या घरांची ऑनलाईन सफर घडवून आणणे आणि त्याची ऑनलाइनच विक्री करणे!
सध्या लॉकडाऊनमुळे लोक घरीच बसले आहेत. ऑफिसचे काम बहुतेक जण घरातूनच करत आहेत. त्यामुळे इंटरनेटचा वापर वाढत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे घर घेण्याचे हे चित्र बदलत आहे. आपलं स्वप्नातलं घर शोधण्यासाठी ग्राहक इंटरनेटचा अधिकाधिक वापर करत असल्याचा नवीन ट्रेंड पाहायला मिळत आहे. आपलं स्वप्नातलं घर शोधणं आता सोपं झालं आहे. इंटरनेटमुळे घर विकत घेण्यापासून ते विकण्यापर्यंत तसंच लिव्ह-लायसन्सपासून अगदी भाड्याने घर देण्यापर्यंतचे सर्व पर्याय इतर कोणाच्याही मदतीशिवाय घर ग्राहकांना खुले झाले आहेत. कपडे, इलेक्ट्रॉनिक उपकरणं विकत घेण्याबरोबरच घर आणि इतर प्रॉपर्टीज घेण्यासाठीदेखील ई-कॉमर्स हे एक चांगलं व्यासपीठ बनलं असून याचा परिणाम रिअल इस्टेट मार्केटवर मोठ्या प्रमाणावर होत आहे.
ऑनलाईन प्रॉपर्टी शोधणाऱ्यांची संख्या नक्कीच वाढली आहे. हे प्रमाण गेल्या तीन महिन्यात २० ते ३० टक्क्यांनी वाढले आहे. प्रॉपर्टी वेबसाइट्सवर बिल्डर्स, विकासक तसंच त्यांचे चालू आणि येऊ घातलेले प्रोजेक्ट्स याविषयी सविस्तर माहिती दिलेली असते. या व्यतिरिक्त घरबसल्या ग्राहकांना सॅम्पल फ्लॅटदेखील बघता येतो. आणि आता लॉकडाऊनच्या काळात तर नव्या घराची एक व्हर्च्युअल टूर सुद्धा ग्राहकांसाठी आयोजली जाते. म्हणूनच ऑनलाइन प्रॉपर्टी बघणं हा सध्यासाठी उत्तम पर्याय ठरत आहे. तसेच तो सोयीचा असल्याने ग्राहकांकडून निवडला जात आहे.
त्यामुळे ग्राहकांच्या सोयीसाठी आता आम्ही 'नानी'ज बिल्डकॉन' मध्येही ग्राहकांना घराची एक व्हर्च्युअल सफर घडवून आणणार आहे. तुम्हाला हव्या असणाऱ्या घराची आम्ही ऑनलाईन सफर अरेंज करून तुम्हाला घराचे दर्शन करून देणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला घरबसल्या नव्या घराचे दर्शन होईल. तुम्हाला आवडल्यास लगेच तुम्ही ते घर तिथल्या तिथेच बुक सुद्धा करू शकता. यासाठी आमची टीम तुम्हाला हवे ते सहकार्य करेल. तुम्हाला कोणत्याही शंका असल्यास त्या शंकेचे निरसन करणे हेच आमचे काम आहे.
'ऑनलाईन घर कसे बुक करता येईल, असा कसा विश्वास ठेवायचा, काही चुकीचे तर नाही ना' हे सर्व चिचार आता आपल्या मनातून काढून टाका. कारण ऑनलाईन घर खरेदी हीच नव्या मॉडर्न जगाची हीच ओळख आहे. यासोबतच ग्राहकांचा विश्वास जपणे ही नानी'ज बिल्डकॉनची वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा आहे. त्यामुळे कोणतीही काळजी करू नका. घराची व्हर्च्युअल टूर करा आणि त्यानंतर तुमचे स्वप्नातले घर लगेच बुक करा..