What’s in the budget for real estate sector?
View Blog
तुम्हाला ही स्वतःचे घर खरेदी करायचे आहे आणि त्यासाठी तुम्ही अनेक प्रयत्न करतात. मग तुम्ही त्यासाठी अनेक प्लॅनिंग करतात. आणि एका अंतिम टप्प्याला जाऊन पोहोचतात जिथे तुम्ही खरेदी करण्यासाठी अनेक प्रोजेक्ट्सना स्वतः जाऊन भेट देतात. त्यातला तुम्हाला एखादा प्रोजेक्ट आवडला सुद्धा असतो आणि ते घर किंवा ती प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी तुम्ही तयार सुद्धा होतात. पण तुम्ही खरेदी करत असणारी प्रॉपर्टी सुरक्षित आहे कि नाही हे माहिती नसते आणि तुम्हाला कसे कळणार. तर सोपे आहे सरकारद्वारे त्या जागेला मान्यता देणारे काही कायदेशीर कागदपत्र असतात त्याची आपल्याला पडताळणी करणे गरजेचे असते. ती कागदपत्रे पुढीलप्रमाणे:
बिल्डिंग प्लॅन
प्रॉपर्टीची खरेदी करताना सर्व प्रथम बिल्डिंग प्लॅन पाहणे अत्यंत महत्त्वाचे असते. आपल्याला ते अंतिम निर्णय घेण्याच्या आधी पडताळणी करून घेणे सुद्धा तितकेच आवश्यक असते. त्या प्लॅनला महानगरपालिकेने मंजुरी दिली आहे हे सुद्धा पाहावे लागते. त्याच बिल्डिंग प्लॅनला 'साईट प्लॅन' सुद्धा म्हणतात. त्यात तुम्हाला त्या प्लॅनमध्ये काय काय गोष्टी असणार याची माहिती ब्ल्यू प्रिंट देते.
डेव्हलपरने सुद्धा मंजूर केलेला प्लॅन ग्राहकांना दाखवणे बंधनकारक असते. प्रकल्पाच्या खरेदीदाराने हे सुनिश्चित केले पाहिजे की हा प्रकल्प किंवा त्या इमारतीचे लेआउट स्थानिक प्राधिकरणाद्वारे पूर्णपणे मंजूर झाले आहे किंवा नाही. हे जाणून घेणे महत्वाचे आहे कारण भविष्यात एखादी अनधिकृत इमारत पाडण्याच्या वेळेला तुम्ही सुद्धा काही करू शकत नाही.
टायटल डिड
टायटल डिड हा एक लेखी करारनामा असतो ज्यात आपल्याला कागदपत्रावर प्रॉपर्टी संबंधित सर्व माहिती मिळते. हे एक असे कागदपत्र आहे जे मालमत्तेवर मालकी हक्काचा संपूर्ण हक्क असल्याचे सांगते. त्याचबरोबर आपण पुनर्विक्रीची मालमत्ता खरेदी करीत असल्यास त्या मालमत्ता संबंधित विक्रेत्या मालकीची आहे की नाही हे तपासण्याची आपल्याला आवश्यकता आहे. त्याचमुळे आपल्याला डीडच्या सर्व अटी देखील तपासणे गरजेचे असते.
आपण या क्षेत्रात नवीन खरेदीदार असल्यास डीडचे तपशील आणि अटी तुम्हाला समजल्या नाही तर मग या प्रकरणात तुम्ही डीड टायटलचा तपशील समजून घेण्यासाठी प्रॉपर्टी डीलर किंवा वकिलाशी संपर्क साधू शकता. जर डीड विक्रेत्याच्या नावावर नसेल तर मालमत्ता खरेदी करणे धोकादायक आहे.
अधिवास प्रमाणपत्र (Occupancy Certificate -OC)
अधिवास प्रमाणपत्र हे प्रकल्प पूर्ण झाल्यावर साधारणपणे स्थानिक सरकारी एजन्सीकडून दिले जाते. ज्यात सर्व साईट वरील गोष्टीची पडताळणी केली जाते. ती साईट रहिवाशांना राहण्यायोग्य व सुरक्षित असल्याचे सुनिश्चित करून सांगण्यात येते. हे सर्वात महत्त्वाचे कागपत्र आहे जे डेव्हलपरने प्रॉपर्टी खरेदी करणाऱ्या ग्राहकाला देणे गरजेचे आहे. तसेच, बँक किंवा वित्तीय संस्थांकडून गृह कर्ज घेताना अधिवास प्रमाणपत्र (Occupancy Certificate (OC)) हे एक आवश्यक कागदपत्र आहे.
एन्कम्ब्रन्स प्रमाणपत्र (Encumbrance Certificate or EC)
एन्कम्ब्रन्स प्रमाणपत्र (Encumbrance Certificate or EC) हे असे प्रमाणपत्र आहे जे आपल्याला हमी देते कि आपण खरेदी करत असलेली प्रापर्टी अथवा घर हे कोणत्याही कायदेशीर किंवा कुठल्याही कर्जामध्ये येत नाही. हे एक कागदपत्र आहे जे सब-रजिस्ट्रारद्वारे जारी केले जाते.
बर्याच मेट्रो शहरात मालमत्तेच्या किंमती वर्षानुवर्षे वाढत आहेत. मेट्रो शहरात मोक्याची जागा मिळणे अधिक चांगले असते. त्यासाठी नानी'ज बिल्डकॉन घेऊन आले आहेत वेदांत गार्नेट एक असा प्रोजेकट त्यात तुम्हाला मिळेल २ BHK, ३ BHK प्लस टेरेस ऑफोर्डब्ल फ्लॅट जो बसणार तुमच्या रिअल इस्टेटच्या इनव्हेसमेंटमध्ये फायदेशीर ते ही तुमच्या आवडत्या शहरात म्हणजे आपल्या नागपूरमध्ये! आपल्याला ही रिअल इस्टेट गुंतवणूकीकडे जाण्याची ही योग्य वेळ आहे. वैयक्तिक वापरासाठी एखाद्या सुरक्षित आणि योग्य मालमत्तेत गुंतवणूक करा.
आजच आम्हाला संपर्क करा आणि तुमच्या भविष्याची गुंतवणूक सुरक्षित करा.