What’s in the budget for real estate sector?
View Blog
आता नागपुरमधे घर घेणं झालं सोप्पं !आपलं एक सुंदर घर असावं असं प्रत्येकाला वाटतं पण बऱ्याचदा अपुऱ्या बजेटमुळे आपल्याला थांबावं लागतं. कधी आपल्या मनाविरुद्ध कमी बजेट मधे गुंतवणूक करावी लागते. पण आता घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारच्या मुद्रांक क्षुलकाच्या कपातीमुळे नागपुरच्या रिअल इस्टेट सेक्टर मधे तेजीची अपेक्षा करायला हरकत नाही. सरकारच्या नवीन धोरणानुसार मुद्रांक क्षुलकामधे जे ६% आकारले जात होते ते आता ३% आकारले जाईल. हे नवे नियम सप्टेंबर १ पासून ते डिसेंबर ३१ २०२० पर्यंत लागू झाले आहेत. या नव्या दारा मुळे नागपुरच्या बांधकाम क्षेत्राला चांगले दिवस येतील असा अंदाज आहे.
तज्ज्ञांच्या मते आत्ताच एप्रिल महिन्याचे बुकिंग सुरु झाले असून हि एक चांगली सुरवात मानली जात आहे. कोरोना आणि लॉकडाउन मधे रिअल इस्टेट क्षेत्राला आलेली मरगळ काही प्रमाणात कमी होईल आणि सकारात्मकता वाढेल असं तज्ज्ञांचं मत आहे. संत्र्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या नागपुर शहरात मागील काही वर्षांपासून तिथल्या पायाभूत सुविधा आणि व्यावसायिक क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे नागपुर शहर हे प्रसिद्धीला आला आहे. नूतनीकरण आणि सांस्कृतिक वारसा यांची योग्य सांगड यामुळे नागपुर कडे एक जागतिक दर्जाचा शहर म्हणून पहिला जात आहे. मुद्रांक क्षुलकाच्या कपातीमुळे घर खरेदी करण्यासाठी लोकांची उत्सुकता अजून वाढलेली आहे. नागपुरच्या रिअल इस्टेट क्षेत्राकडे एक राष्ट्राच्या प्रगतित आणि आर्थिक उलाढालीत भर घालणारे शहर म्हणून पहिले जात आहे.
गुंतवणूकदारांना आणि घर विकत घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी हि एक सुवर्ण संधी मानली जात आहे. बांधकाम क्षेत्रामधे मागील काही वर्षां पासून अनेक बदल झाले आहेत. नव्या काळानुसार आणि आधुनिक नवीन जीवनशैलीची कास धरत अनेक बिल्डर आपल्या प्रोजेक्ट मधे विविध सोयीसुविधा देताना आपण पाहत आहोत. तर तुमचं घर नुसता घर राहिलेला नसून एक दर्जेदार आणि कुशल स्पेस झालेली आहे जिकडे कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीचा विचार केला जातो आहे. नागपुर मध्ये अनेक बिल्डर्स आहेत ज्यांनी ग्राहकांना महत्वाचं स्थान दिला आहे आणि त्यामध्ये अग्रेसर नाव आहे नानी'ज बिल्डकॉनच! नानी'ज बिल्डकॉनने नागपुर शहरामध्ये अनेक प्रोजेक्ट्स सुरु केले असून नागपुर शहराच्या विकासात आपला मोलाचा योगदान दिला आहे.
मुद्रांक क्षुलकाच्या कपातीमुळे आणि नागपुरच्या प्रगती मुले इथल्या रिअल इस्टेट क्षेत्रला चांगले दिवस येतील असा वाटतं आहे.