What’s in the budget for real estate sector?
View Blog
कोरोनाने जगात जो तांडव माजवलेला आहे त्यामुळे अख्ख जग हैराण झालं आहे. सावधानता बाळगून सुद्धा आज जगभरात कोरोनाचे थैमान कमी होण्याचे नाव घेत नाहीये. यामुळे जगाला अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे. भारतालाही या संकटाचा सामना करावा लागत आहे. कारण भारतात सुद्धा कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे.
कोरोनाशी लढण्यासाठी भारत पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरले आहे. अनेक देशांना भारत मदत करत आहे. आपल्या देशाला कोरोनापासून मुक्त करण्याची धडपड करत असताना दुसऱ्या देशांनाही भारत जमेल ती मदत करत आहे. त्यामुळे लवकरच भारतातून कोरोनाचे संकट जाईल अशी आशा आहे. कोरोना संकटांनंतरही देशाचे आर्थिक गणित सुधरविण्यासाठी सुद्धा भारत काम करत आहे. त्यात मेट्रो सिटीजचा नक्कीच वापर होईल.
मुंबई, दिल्लीनंतर आता त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत नागपूर शहर सुद्धा ग्रो होत आहे. नागपूर आता ऑरेंज सिटी वरून स्मार्ट सिटी बनण्याच्या मार्गावर आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की नागपूरमध्ये सुद्धा मेट्रोचे काम सुरु आहे. त्यामुळे नागपूर शहरही आता मेट्रो सिटी म्हणून नावाजली जाऊ लागली आहे. मुंबई, दिल्ली प्रमाणेच नागपूरमध्ये ही काही काळानंतर आयटी हब आणि भरपूर प्रायव्हेट कंपन्या सुरु होण्याच्या मार्गावर आहेत. कोरोनाचे संकट गेल्यानंतर नागपूरमध्ये सुद्धा गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये झपाट्याने वाढ होईल.
नागपूर हे फार पूर्वीपासून एक पॉलिटिकल हब म्हणून ओळखले जाते. रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री श्री. नितीन राऊत यांसारखे अनेक मोठमोठे पॉलिटिशिअन्स नागपूर मधून आहेत. त्यामुळे झपाट्याने विकसित होणाऱ्या शहरांमध्ये आता नागपूरचे सुद्धा नाव घेतले जाते. याचे मुख्य कारण की दिवसेंदिवस येथे गुंतवणूक वाढत आहे. गुंतवणूकदारांची मागणी सुद्धा वाढत आहे. मेट्रो सुरु झाल्यापासून इथे अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी गुंतवणूक करणे सुरु केले आहे. मोठमोठे शॉपिंग मॉल्स बांधले गेले आहेत. रामदेव बाबांनी नागपूर शहरात पतंजलीमार्फत मोठी गुंतवणूक केली आहे. यासोबतच अनेक मोठमोठ्या बिल्डर्सने मोठमोठाले प्रोजेक्ट्स हाती घेतले आहे.
नागपूरमध्ये असणारी ग्रीनरी आणि पुष्कळ ऐसपैस जागा हे पॉईंट्स गुंतवणूकदारांनी बरोबर हेरले आहेत. एक उत्तम स्मार्ट सिटी काय असते ते आपल्याला नागपूरच्या माध्यमातून काही वर्षांनी दिसून येणार आहे. स्वामीनारायण मंदिर, रामटेक फोर्ट टेम्पल, अंबा खोरी, वाकी वूड्स, महाराजबाग, अक्षरधाम मंदिर, फुटाळा तलाव, अंबाझरी तलाव, दीक्षा भूमी, खिंडसी तलाव, रमण सायन्स सेंटर नागपूरमधील व जवळील टुरिस्ट स्पॉट्स पर्यटकांना आकर्षित करून घेत आहे. यासोबतच प्राणीप्रेमी व जंगल सफारी आवडत असणाऱ्यांसाठी पेंच, ताडोबा, नागझिरा यांसारखे नॅशनल पार्क नागपूर जवळ आहेत. त्यामुळे येथे नेहमीच टूरिस्ट्सची गर्दी असते.
यासर्वांसोबतच नागपूरमध्ये एक महत्त्वाचा प्रोजेक्ट लोकांना आकर्षित करून घेत आहे, तो म्हणजे 'नानीज बिल्डकॉन'. नानीज हा प्रोजेक्ट रेरा रजिस्टर प्रोग्रॅम असून हा एक ग्रीनरी प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टमध्ये एक इन्व्हेस्टमेंट मल्टिपल बेनिफिट्स तुम्हाला मिळू शकतात. प्राईड ऑफ ओनरशिप, नॉन व्होलाटाइल असा हा प्रोजेक्ट असून यामध्ये भारत सरकारची 'प्रधान मंत्री आवास योजना' हा प्रोग्रॅम राबवला जात आहे. त्यामुळे घर घेताना तुम्हाला आवास योजनेतर्फे अनेक फायदे सुद्धा मिळू शकतात. जरी तुमचे स्वतःचे घर असले तरीही नागपूरमध्ये घेतलेले घर हे भविष्यातील गुंतवणुकीच्या दृष्टीने तुमचे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल