What’s in the budget for real estate sector?
View Blog
जसे की आपण आधीच्या ब्लॉगमध्ये घराच्या किमतींविषयी माहिती बघितली होती, त्याचप्रमाणे आता लॉकडाऊन हळू हळू शिथिल होत असताना घरांच्या किमतींविषयी नव्या गोष्टी माहिती होऊ लागल्या आहेत. ज्यामध्ये घरांच्या किमतींविषयी विविध तर्क-वितर्क समोर येऊ लागले आहेत.
कोरोनामुळे अनेक क्षेत्रांना लॉकडाऊनमुळे फटका बसला आहे, त्यापैकी एक क्षेत्र रिअल इस्टेटचे आहे. या क्षेत्राचा देखील कारभार धीम्या गतीनेच सुरू झाला आहे. मात्र आता लॉकडाऊन संपल्यानंतर घर घेण्याचे तुमचे स्वप्न अजून थोडे लांबणीवर जाईल अशे संकेत दिसून येत आहेत. तुम्हे घर घेण्याचे स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकता, पण कदाचित वाढल्या किमतींमुळे तुम्हाला पुन्हा काही काळ वाट बघावी लागेल अशी शक्यता दिसून येत आहे. अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सरकारकडून सिस्टिमध्ये मोठ्या प्रमाणात लिक्विडिटी आणली जात आहे. याचा परिणाम रिअल इस्टेटवर सुद्धा होत आहे. कोरोना व्हायरसचे संकट येण्याआधी फ्लॅट्सच्या किंमती 30 टक्क्यांनी घसरल्या होता, आता लॉकडाऊनचा परिणाम या क्षेत्रावर होण्याची शक्यता आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वच उद्योगधंदे पुरते कोलमडले आहेत. नोटबंदी, जीएसटीमुळे आधीच फटका बसलेल्या बांधकाम व्यावसायिकांना आता लॉकडाऊननंतर महागाईच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्व कामकाज, कंपन्या, उत्पादने बंद होते. पण आता लॉकडाऊन शिथिल केल्यावर सिमेंट,लोखंड, स्टीलच्या किमती वाढल्याने अचानक मोठा आर्थिक भार बांधकाम व्यावसायिकांना सहन करावा लागणार आहे. त्याचा फटका अर्थातच बांधकाम उद्योगाला बसणार असल्याचा दावा विकासकांनी केला आहे. यामुळे घरांच्या किमती कमी करण्याची इच्छा असली तरी तसे करता येणार नाही असे दिसून येत आहे.
आता तर लॉकडाउन शिथिल झाल्यावर देशभरात घर बांधकामाच्या सर्वच सामानाच्या किमती वाढल्या आहेत. सिमेंटच्या प्रत्येक गोणीमागे शंभर ते दीडशे रुपये वाढ झाली असल्याने ही वाढ बांधकाम खर्चात जोडली जाणार आहे. तसेच बांधकामासाठी लागणाऱ्या लोखंडाच्या किमतीत प्रति मेट्रिक टनमागे दोन ते अडीच हजार रुपये वाढ झाल्याने तोही भार व्यावसायिकांना उचलावा लागेल. यामुळे अशा वेळी घरांच्या किमती कमी होण्याऐवजी निश्चितच अधिक होणार हे नक्की.